Pimpri : प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर पिंपरी-चिंचवडच्या मुली सादर करणार शास्त्रीय नृत्य

पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाचा क्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नगरी केवळ आता उद्योगनगरी (Pimpri)उरली नसून आता सांस्कृतीक ओळख देखील निर्माण होत आहे. त्याच सांस्कृतीक क्षेत्रात आता पिंपरी-चिंचवडकरांनी मानाचा तुरा खोवला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील पायल नृत्यालयाच्या सहा मुली येत्या 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान व संपूर्ण देशा समोर त्यांचे शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.पिंपरी-चिंचवडमधून असी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Pimpri : माजी स्वीकृत नगरसेवक सुरेश गादीया यांचे निधन

तोषवी दळवी, मानसी भागवत, (Pimpri)वैष्णवी सपकाळ, श्रिया चक्रदेव, अनुष्का अलोनी आणि श्रावणी शाळीग्राम अशी निवड झालेल्या मुलींची नावे आहेत. या सर्व 18 ते 25 या वयोगटात असून त्यांचे शिक्षण पुर्ण करत आहेत. पायल गोखले या त्यांच्या गुरु असून या मुली मागील 13 वर्षापासून पायल नृत्यकला येथे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत. मागील दोन वर्षापासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नृत्य सादरिकरणाचा समावेश केला आहे.

त्यांना सध्या दिल्ली येथे बोलावले असून या सहा ही जणी राजपथावर परेडचे एक महिन्याचे प्रशिक्षण घेत आहेत. निवड समितीकडे पायल नृत्यालयाने या मुलींच्या नृत्य सादरीकरणाचा एक व्हिडीओ बनवून निवड समितीकडे पाठवला होता. त्या व्हिडीओमधील नृत्य पाहून संपूर्ण भारत भरातील शेकडो हजारो मुलींमधून या सहा मुली निवडल्या गेल्या आहेत. पालकांनाही या गोष्टीचा अभिमान वाटत आहे.

त्यांच्या या प्रवासाबद्दल एमपीसी न्यूज शी बोलताना त्यांच्या गुरु पायल गोखले म्हणाल्या की, माझ्या मुलींची निवड होणे हे त्यांच्या व माझ्या मेहनतीचे चिज आहे. मुळात कथ्थक हे केवळ प्रसिद्धीसाठी नसून उलट कथ्थक च्या प्रसारासाठी आपल्याला जगासमोर एक उत्तम कथ्थक नृत्य सादर करणे गरजेचे आहे, त्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे ही भावना या सहा मुलींमध्ये आहे. त्यामुळे त्यांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे, या संधीचे त्या सोनं करतील यात कोणतीही शंका नाही असा विश्वास पायल गोखले यांनी व्यक्त केला.

पायल गोखले या 2007 सालापासून पिंपरी-चिंचवड शहरात पायल नृत्यालय चालवत आहेत. त्यांच्याकडे सध्या 175 मुली कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहेत.तसेच त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारती विद्यापीठ येथे नृत्य गुरु म्हणून नृत्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.कथ्थक नृत्याचा प्रसार व्हावा, नागरिकांमध्ये याबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी पायल गोखले यांनी कोरोना काळातील लॉकडाऊन आधी एक वर्ष चिंचवड येथे मासिक नृत्यसभा देखील भरवल्या होत्या.

त्यांच्या या मेहनतीला त्यांच्याच विद्यार्थीनीं नी फळ दिले आहे. केवळ पायल नृत्यालय नाही तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन हा मानाचा ठरणार आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.