Pimpri : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोविंद घोळवे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज  – शिवसेना राज्य संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. लढवय्ये असणा-या गोविंद घोळवे यांनी पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा-यांसाठी लढा उभारावा, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेने मदतयाग सुरु केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (दि.9) बीड आणि जालना जिल्ह्यतील शेतक-यांना मदतीचे वाटप करण्यात आले. तत्पुर्वी, मराठवाड्याचे सुपुत्र असणा-या गोविंद घोळवे यांचा भगवे उपरणे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना उपनेते, खासदार चंद्रकांत खैरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि पत्रकार वसंत मुंडे,वैभव स्वामी उपस्थित होते.

गोविंद घोळवे यांनी दैनिक ‘पुढारी’त ब्युरो चीफ तर, दैनिक ‘सकाळ’मध्ये राजकीय कार्यकारी संपादक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या सचिवपदाचा कार्यभारही त्यांनी 17 वर्षे सांभाळला आहे. शिवसेनेचे राज्य संघटक म्हणून ते सक्रीय आहेत. बहुजन समाजातील झुंजार पत्रकार,नि:स्वार्थी स्पष्टवक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अन्यायाविरुध्द त्यांनी आपल्या लेखनीतून नेहमीच आवाज उठविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.