Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्योगनगरीतून अभिवादन 

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  विविध सामाजिक, राजकीय संस्थेच्या माध्यमांतून अभिवादन करण्यात आले. 
पिंपरी-चिंचवड शहरात  काका इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने ज्ञानेश्वर  हनुमंत तापकीर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नवीन तापकीर, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, निलेश तापकीर, अमोल  देवकर  हर्षल तापकीर, रविराज तापकीर, विराज तापकीर, गणेश भोसले, निखिल जाधव, अनिकेत शेलार उपस्थित होते.

  • पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान व आठवडी बाजारात, तसेच कृष्णा चौक व इतर उपनगरात कवींनी कवितेतून मतदान जनजागृती केली, यामध्ये प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर याना 128 व्या जयंती निमित्त आभिवादन करुन  भित्तीपत्रके, पथनाट्याद्वारे कवितेतून जनजागृती करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुकीत, व कार्यक्रमात देखील पत्रके वाटून जनजागृती केली. राष्ट्रीय कर्तव्य समजून भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी  केले.
वेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ आभिषेक हरिदास, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, मुळशी विभाग प्रमुख संजना करंजवने, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा उपाध्यक्षा गुलशन नाईकुडे, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे, कवी शरद शेजवळ, सुहास घुमरे, ज्येष्ठ कवी तुकाराम पाटील, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, युवक अध्यक्ष धनराजसिग चौधरी, ऋतुजा जोगदंड, महाराष्ट्र सचिव जयश्री गागरे, क्षमा धुमाळ, नियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते अनिल  पालकर, जालंदर दाते,  जनार्दन बोरले, प्रकाश बंडेवार,  सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड, एस डी विभुते, अक्षय जगदाळे, नितीन जोगदंड आदी सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.