Pimpri : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले.  महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्यापुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या सुलक्षणा धर (शिलवंत), अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अजय जाधव, एम. एम.शिंदे सामाजिक कार्यकर्ते शरद रोकडे, बाळासाहेब बाबरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.