Pimpri : ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ विषयावर रविवारी मार्गदर्शन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना स्वनिर्मितीचा आनंद घ्यावा, यासाठी पुण्यातील इकोएक्झिस्ट आणि पिंपळे सौदागर येथील रोजलॅंड सोसायटी यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवारी (दि. 9) पिंपळे सौदागर येथील रोजलॅंड सोसायटी येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे.

गणेशोत्सवासाठी अगदी काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेक संस्था आणि नागरिक पुढाकार घेतात. त्यातच पुणे येथील इको एक्झिस्ट आणि पिंपळे सौदागर येथील रोजलॅंड सोसायटीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  • यामध्ये गणेश मूर्ती, वापरण्यात येणारे रंग आणि सजावट या सर्व बाबी पर्यावरणपूरक पद्धतीने कशा कराव्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गणेश मूर्ती तयार करण्यसाठी उत्सवापूर्वी काही दिवस तयारी सुरु होते. ते नियोजन सुयोग्य पद्धतीने व्हावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडू माती, पेपर पासून बनवलेल्या मूर्ती वापराव्यात.

  • नैसर्गिक रंग आणि सजावट देखील नैसर्गिक पद्धतीने सजावट करावी, यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत शहरातील हाऊसिंग सोसायटी प्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.