Kudalwadi : स्वच्छतागृह बांधण्याची नागरिकांची मागणी- दिनेश यादव

एमपीसी न्यूज – कुदळवाडी येथे ठिकठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात यावी. स्वच्छतागृहे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेला उद्योगनगरीत स्वच्छतागृहे बांधता का येत नाही? असा सवाल नागरिक करीत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधावी, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी ‘फ’ प्रभाग स्थापत्य विभागाकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी आहे. या उद्योगनगरीत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करीत आहेत. चिखली कुदळवा़डी भागांत महापालिकेने एकही स्वच्छतागृहे बांधले नाही. तरी जेथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वच्छतागृहे बांधण्यात यावी.

  • स्थापत्य विभाग अधिका-यांना वारंवार फोन वरुन प्रत्यक्ष भेटून स्वच्छता गृह बांधण्यासाठी संपर्क साधला. जागा दाखविली तरी अधिकारी अजून काही हालचाल करीत नाही. प्रशासनाने या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.