Pimpri : आयआयएमएसच्या ‘क्रिसेंडो’ला उत्साहात सुरुवात

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या 'इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचा उपक्रम

एमपीसी न्यूज – यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस)मध्ये क्रिसेंडो या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाट्न आज सकाळी (सोमवारी) संस्थेचे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे यांच्या प्रमुख  उपस्थितीत करण्यात  आले.

बुद्धिबळ,कॅरम, क्रिकेट, फेस पेंटिंग, गायन, नृत्य, रांगोळी, नेमबाजी, टाकाऊ  पासून  टिकाऊ वस्तू  बनवणे, (बेस्ट  फ्रॉम  वेस्ट), टेबल  सॉकर, ऍड मानिया (जाहिरात तयार करणे), अभिरूप  शेअर  बाजार  (मॉक  स्टॉक) अशा  विविध  कला क्रिडा प्रकाराच्या  स्पर्धा दोन  दिवस  चालणार  आहेत. यामध्ये  पुणे, पिंपरी चिंचवडमधील  विविध व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील  सुमारे तीनशेहुन जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला  आहे.

क्रिसेंडोची यंदा  ‘इनक्रेडिबल  इंडिया’  अर्थात  ‘अतुल्य  भारत’  ही  संकल्पना असल्याने संस्थेच्या संपूर्ण  परिसरात  विविधतेतील  एकात्मतेचे  दर्शन  घडविणारी चित्रे  सजवण्यात  आली आहेत. युवावर्गात  विशेष  आकर्षण  असलेला  सेल्फी  पॉईंटसुद्धा संस्थेत  उभारण्यात  आला आहे.

अशा  उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपापसात असलेली  मैत्री, एकमेकांना  मदत करण्याची  भावना वृद्धिंगत  होते. तसेच खेळीमेळीच्या  वातावरणात  जय- पराजय  अनुभवत या   स्पर्धांचे आयोजनही  विद्यार्थ्याकडूनच  करण्यात  आल्याने, कार्यक्रमाची  आखणी, संघटन कौशल्य, कामांची  विभागणी कशी  करायची  आदी  व्यवस्थापन  कौशल्य  त्यांना  प्रत्यक्ष  अनुभवायला  मिळतात असे  मत संस्थेचे  संचालक  डॉ. शिवाजी  मुंढे  यांनी  आपल्या  मनोगतात  व्यक्त केले.

यावेळी उद्घाटन सोहळ्याला  आयआयसीएमआर चे संचालक डॉ. अभय  कुलकर्णी,  कॅम्प  एज्युकेशन सोसायटीचे संचालक  डॉ. भारत  कासार, डॉ.डी. वाय. पाटील  मॅनेजमेंट  इन्स्टिट्यूटचे संचालक  डॉ. सुनिल धनवडे, प्रतिभा इन्स्टिट्यूटचे  संचालक डॉ.सचिन बोरगावे यांच्यासह  आयआयएमएसचे सर्व  प्राध्यापक  वर्ग  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.