BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : प्रेमभंग झाल्याने तरुणीची आत्महत्या; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज- प्रेमसंबंध निर्माण करून तसेच लग्नाच्या आणाभाका घेऊन प्रियकराने अचानक लग्नाला नकार दिल्याने तरुणीने विष घेत जीवन संपवले. शनिवारी (दि.6) चिंचवड पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी तरुणीच्या 29 वर्षीय मैत्रिणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विराज गुलाब दराडे (रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली राजू गवळी (वय 25, रा.नढेनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

आरोपी विराज याने ओळखीचा गैरफायदा घेत त्याने वैशालीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. मात्र त्यानंतर लग्नास नकार देत वैशाली यांचा मानसिक त्रास दिला. यामुळे वैशालीला नैराश्याने ग्रासले होते. अनेकदा प्रयत्न करूनही विराज लग्नाला तयार न झाल्याने अखेर वैशाली 2 एप्रिलला सायंकाळी सातच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3