Pimpri : बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्टच्या वतीने जनेऊ कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्टचा स्थापना दिवस विविध धार्मिक उपक्रमाने पिंपरी कॅम्पात साजरा करण्यात आला. यावेळी 28 मुलांना जनेऊ कार्यक्रमांत समावेश केला.

पिंपरी कॅम्पातील बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्टचा ज दहावा मूर्ती स्थापना दिवस असतो. यादिवसानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी हवन, पूजा, जनेऊ संस्कार असे कार्यक्रमांना सिंधी बांधवानी उपस्थिती लावली.

  • जनेऊ मध्ये 28 मुलांचा सहभाग होता. त्यांना धागा बांधून संस्कारित धार्मिकतेची शिकवण देण्यात आली. याबाबतीत माहिती देताना बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्टचे सचिव जवाहर कोटवानी म्हणाले की, मुंज व ही एक भारतातील पारंपरिक प्रथा आहे. बाळाला विदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते, त्याला उपनयन संस्कार असे म्हणतात.या संस्कारात जाणवे धारण करणे हा मुख्य उद्देश व विधी आहे.

यावेळी 28 मुलांनी घेतलेल्या जनेऊ संस्कारात त्यांना आकर्षक असे गिफ्ट देण्यात आले. यावेळी भगवान लालवाणी, मास्तर बल्लू मल, मोहन काका, सुदाम काका, जगदीश सिंग, रमेश वाधवानी, बाबा छतुराम लाल मंदिर ट्रस्टचे सचिव जवाहर कोटवानी आदी उपस्थित होते. यावेळी सिंधी समाजातील महिला व पुरुषांसह उत्साहात सहभाग नोंदविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.