Pimpri : पिंपरी गावातील श्री काळभैरवनाथ उत्सव बुधवारी

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील श्री काळभैरवनाथ उत्सव बुधवारी (दि. 8 मे)असून यात्रेनिमित्त श्री काळभैरनाथ चषक आणि निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.

पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरनाथ महाराज यांचा उत्सव बुधवारी (दि. 8) आणि गुरुवारी (दि. 9) या दोन दिवसीय कालावधीत होणार आहे. यानिमित्त बुधवारी (दि. 8 मे) पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत श्री काळभैरनाथ महाराजांचा अभिषेत आणि महापूजा होणार आहे. रात्री नऊ वाजता श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक होणार आहे.

  • तसेच गुरुवारी (दि. 9 मे) श्री काळभैरनाथ चषक आणि निकाली कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. कुस्त्यांसाठी सहा लाख रुपये आणि चांदीची गदा देण्यात येणार आहे. कुस्त्यांचा आखाडा नव महाराष्ट्र विद्यालय क्रींडांगणात दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.