Pimpri : कासारवाडीतील ‘त्या’ मुलाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पिंपरी युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना शेजारील इमारतीची भिंत कोसळून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी पुढील दहा दिवसांत दोषी अधिकारी यांना निलंबित करुन आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच याबाबत चौकशी सुरु न झाल्यास युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, कासारवाडी येथील यशवंत सोसायटीजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत ड्रेनेजचे काम करणारे मजूर गंभीर जखमी होऊन यात मुलाचा मृत्यू झाला.

  • ड्रेनेजच्या कामासाठी खोलवर खोदकाम करत असताना शेजारी असलेल्या संरक्षक भिंतीला कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही. त्यामुळे भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. तरी या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.