Pimpri : रिक्षा चालकांचे महामंडळ कार्यान्वित न झाल्यास आंदोलन – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – रिक्षा चालकांच्या महामंडळाची घोषणा अनेक (Pimpri) वेळा करण्यात आली मात्र आर्थिक निधी नसल्यामुळे हे महामंडळ होऊ शकले नाही. आताही केवळ घोषणाच केलेली आहे. महामंडळ त्वरित सुरू करावे. आर्थिक तरतुदीसाठी आणि रिक्षा चालकांना सक्षम रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र ॲप विकसित करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

कष्टकरी संघर्ष महासंघ व साई तिरंगा ऑटो स्टॅन्डचे निगडी प्राधिकरण येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रामभाऊ कांबळे, कोषाध्यक्ष अशोक पवार,सचिव दिनकर खांडेकर, कार्याध्यक्ष राजाराम व्हणमाने, आदिक बोऱ्हाडे,सहदेव व्हणमाने,बालाजी भोसले,दिनेश गोठणकर, बाबासाहेब सूर्यवंशी, इरफान चौधरी,सलीम डांगे आदी उपस्थित होते.

रिक्षा चालकांचे महामंडळ झाले पाहिजे यासाठी अनेक वर्षापासून (Pimpri) लढा सुरू आहे. राज्य शासनाने यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रिक्षा चालकांचे महामंडळ निर्माण करू असे जाहीर केले.

Pimpri : गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मात्र वारंवार केवळ घोषणा करून प्रत्यक्ष त्यांना काही न देता रिक्षाचालकांकडे सरकार दुर्लक्षच करीत आहे. ओला, उबेर अशा प्रकारचे अनेक खाजगी कंपन्या टॅक्स व इतर लाभ मोठ्या प्रमाणात मिळत असून रिक्षा चालकांना कमी लाभ होत आहे.

ओला, ऊबर या खाजगी ॲप प्रमाणे रिक्षा चालकांचे स्वतंत्र ॲप निर्माण करावे. जेणेकरुन ठराविक निधी हा रिक्षा बुक करणाऱ्या प्रवांशाकडून आणि काही अंशीनिधी रिक्षा चालकाकडून ऑनलाईन पद्धतीने घ्यावा.

त्यातून महामंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल. विविध प्रकारच्या सोयी सुविधा देणे अपघाती विमा संरक्षण देणे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री परिवहन मंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नखाते यांनी नमूद केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.