Pimpri: कृष्णकुमार गोयल यांच्यासह 15 जणांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – शब्द पब्लिसिटीच्या वतीने आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या सहकार्याने यावर्षीपासून दिला जाणारा प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार कृष्णकुमार गोयल (सामाजिक), श्रीनिवास राठी (सामाजिक), सीए विवेक लाहोटी (वाणिज्य क्षेत्र), आशिष देशमुख (कॉस्ट मॅनेजमेंट अकौंटंट) यांच्यासह विविध क्षेत्रातील 15 मान्यवरांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण समारंभ 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता चिंचवडच्या काळभोरनगर येथील प्रतिभा कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शासन प्रणित साहित्य व संस्कृतीचे मंडळाचे अध्यक्ष तथा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व खासदार अमर साबळे आदी उपस्थित राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे अन्य मानकरी पुढीलप्रमाणे आहेत. अस्थिशल्य विशारद डॉ. प्रकाश जाधवर( वैद्यकीय), नीरज दीपक कुदळे (युथ आयकॉन), स्वकाम संस्थेचे अध्यक्ष सुनील तापकीर, निर्माण ग्रुपचे अध्यक्ष सुनील आगरवाल, राजशेखर पिल्ले (औद्योगिक), निशीता घाटगे (महिला उद्योजिका), जगन्नाथ काटे ( उत्कृष्ट शाळा पी. के. इंटरनॅशनल स्कूल), अरुण चाबुकस्वार (शैक्षणिक), स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रमेश सोनवणे (वैद्यकीय), रामचंद्र बुडानिया, मनोहर पाटील (वाहतूक व्यवसायिक), सुरेश कंक (साहित्यिक).

कार्यक्रमाचे संयोजक ‘शब्द’चे संचालक शिवाजी घोडे व ‘नवयुग’चे अध्यक्ष राज अहेरराव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.