Pune : महावीर फूड बँकेकडून विशेष मुलांना मिठाई!

एमपीसी न्यूज – सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. सामान्यांप्रमाणे विशेष मुलांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी महावीर फूड बँकेच्या वतीने टिंगरेनगर येथील सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयातील विशेष मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यासह ममत्व आणि संपर्क संस्थेतील मुलांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले. साधारणपणे ५०० मुलांना या मिठाई वाटण्यात आली.

 

_MPC_DIR_MPU_II
महावीर फूड बँकेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांच्या पुढाकारातून गेली १४ वर्षे हा उपक्रम सुरु आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रवीण चोरबेले होते. यावेळी स्वयंम सिद्धा ट्रस्टच्या प्रमुख पुष्पा कटारिया, पूना डाळ आणि बेसन मिलचे सूरज सुनीलजी पारेख, राजश्री पारेख, संगीता छाजेड आदी उपस्थित होते.

 

नेमीचंद संघवी यांच्या स्मृतीनिमित्त आशा संघवी यांनी, तर शांतीलाल छाजेड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रमोद छाजेड यांनी फराळ दिला. यामध्ये लाडू, चिवडा, हलवा आदी मिठाईचा समावेश होता.

 

रंगनाथन शाळेचे वसंतराव पाटोळे यांनी सर्वांचे स्वागत करून मुलांना दिलेल्या मिठाईबद्दल आभार मानले. या मुलांनी काढलेल्या पेंटींग सर्वाना भेट देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.