Pimpri : स्व. संदीप शेवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘भगवतगीता’वर व्याख्यान

एमपीसी न्यूज – स्व. संदीप वसंत शेवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘भगवतगीता’वर व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत शेवडे यांनी माहिती दिली.

संत तुकाराम नगरमधील श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे रविवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता ‘भगवतगीता’ या विषयावर भारत भारतीचे अध्यक्ष विनय पत्राळे हे व्याख्यानपर मार्गदर्शन करणार आहे.

  • यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. अनिल कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य गिरीश भवाळकर, इंद्रायणी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सत्यनारायण चांडक आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे संयोजन समर्पण प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान, अभाविप-पूर्व कार्यकर्ते पुणे जिल्हा, जागृती मित्र मंडळ, झुंजार मित्र प्रतिष्ठान, केसरी प्रतिष्ठान, श्री अनिरुध्द बापू परिवार, मैत्रेय परिवार, अष्टविनायक मित्र मंडळ, संत रोहिदास विचार मंच, स्व. संदीप वसंत शेवडे मित्र परिवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.