Pimpri : विधानसभा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकिळीला दिले जीवदान

एमपीसी न्यूज – चिंचवड रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एक जखमी कोकिळा आपले प्राण वाचविण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. सुमारे 8 ते 10 कावळ्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. दरम्यान, तेथून युवासेनेचे पदाधिकारी जात होते. त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तत्परतेने त्यांनी कोकिळेला पकडून तिच्यावर प्रथमोपचार केले.अन् यामुळे कोकिळीला जीवदान मिळाले.

पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, सुनील कदम यांनी त्या कोकिळेला जीवनदान दिले.

  • त्यानंतर जखमी कोकिळीला पक्षीमित्र हेमंत शेळके यांच्या स्वाधीन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.