Pimpri: लॉकडाउन! उद्यापासून शहरातील PMPLची सेवा बंद

Lockdown! PMPL service in the city will be closed from tomorrow : अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी 15 बस सुरु राहणार

एमपीसी न्यूज – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे उद्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य प्रवाशांकरिता काही मार्गावर सुरू करण्यात आलेली पीएमपीची बससेवा 23 जुलैपर्यंत बस बंद असणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी 15 बस सुरु राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. या काळात सर्वसामान्यांसाठी सुरु झालेली पीएमपीएल सेवा पुन्हा बंद असणार आहे.

पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत काही मार्गांवर सर्वसामान्य प्रवाशांकरिता अनलॉक-1 मध्ये प्रशासनाने काही अटी शिथील केल्यानंतर पीएमपीची बससेवा सुरू केली होती.

30 मार्गावर चालू केलेल्या 80 बसेस प्रवाशांना सेवा पुरवत होत्या. मात्र, पुन्हा लॉकडाउन होणार असल्याने उद्यापासून पिंपरी-चिंचवड हद्दीत सुरू केलेली बससेवा बंद करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच पीएमपीची सेवा सुरू करण्यात येईल, असे पीएमपीलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात फक्त अत्यावश्यक सेवेकरिता बसेसचे संचलन सुरू राहणार आहे.

पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, ”लॉकडाउनमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसाधारण प्रवासी सेवा बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी शहरात 10 ते 15 बस धावतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.