Weather Report : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Chance of torrential rain in sparse places in Central Maharashtra and Marathwada

एमपीसी न्यूज – दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा असून  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेध शाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : मालवण 11, केपे, सावंतवाडी 9 प्रत्येकी, दोडामार्ग, कुडाळ, मुंबई (सांताक्रूझ), पालघर, पणजी (गोवा), पेडणे 7 प्रत्येकी, सांगे 7, कानकोन, वेंगुर्ला 5, दाभोलीम (गोवा), जव्हार, मार्मगोवा, माथेरान, श्रीवर्धन 4 प्रत्येकी, अलिबाग, बेलापूर (ठाणे), भिरा, डहाणू, हर्णे, कणकवली, मडगाव, पेण, फोंडा, राजापूर, रामेश्वरी, रत्नागिरी, संगमेश्वर-देवरुख, सुधागड-पाली, उरण, वसई 3, देवगड, गुहागर, कर्जत, लांजा, महाड, म्हसाळा, पनवेल, ठाणे, वैभववाडी, विक्रमगड 2 प्रत्येकी, चिपळूण, दापोली, खालापूर, मंडणगड, मडगाव, पोलादपूर, रोहा, शहापूर, तलासरी, उल्हासनगर, वाल्पोई, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: दौंड 4, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर, पाचोरा 2 प्रत्येकी, अमळनेर, बोदवड, गगनबावडा, इगतपुरी, कवठेमहाकाळ, मंगळवेढा, पन्हाळा, सुरगणा, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी.

मराठवाडा : किनवट 6, गेवराई 2, बीड, गंगाखेड, हिमायतनगर, मांजलगाव, उमरी 9 प्रत्येकी.

विदर्भ : गोंडपिपरी 6, मूलचेरा 5, मालेगाव, वर्धा 4 प्रत्येकी, बाभुळगाव, बटकुली, दिग्रस, गडचिरोली, जिवती, मंगळुरपीर, मानोरा, साओली, सेलू, वाशिम 3, अहीरी, आर्णी, भद्रावती, भामरागड, चंद्रपूर, देवळी,

धानोरा, इटापल्ली, घाटंजी, कळंब, कोपणी, महागाव, मेहकर, मुल, पातूर, राजुरा, रिसोड, शिंदेवाही 2 प्रत्येकी, अकोला, आमगाव, अमरावती, आरमोरी, आर्वी, बार्शीटाकळी, चामोर्शी, चिखली, कळमेश्वर,

कारंजालाड, काटोल, खारंघा, मूर्तिजापूर, नांदगाव काजी, नेर, पुसद, सालेकसा, समुद्रपूर, सिरोंचा, वणी, वरोरा, यवतमाल 1 प्रत्येकी.

घाटमाथा : भिवपुरी 3, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), शिरगाव, वळवण, कोयना (पोफळी), खंद, खोपोली, अम्बोणे 2 प्रत्येकी, शिरोटा, दावडी, कोयना (नवजा), इुंगरवाडी, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

13 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

14-16 जुलै : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

17 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

इशारा :

13 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता.

14 जुलै : विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

15-16 जुलै :  कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.