Pimpri: संचारबंदीतही दुचाकी चोरीच्या घटनांचे सत्र थांबेना

एमपीसी न्यूज – संचारबंदी लागू असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी, दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसून, तीन दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरीच्या दोन, तर चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन घटना घडल्या आहेत.

बालाजी अशोक आंबीपुरे (वय 37, रा. रहाटणी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या आत्याचा मुलगा महादेव भास्कर गोबाडे यांचे थेरगाव येथील घर 14 ते 15 एप्रिल या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी (एमएच-14, एचई-8496) या क्रमाकांची 25 हजारांची स्पेंल्डर दुचाकी, पाच हजारांची रोकड, 4 हजार रूपयांचे चांदीचे ब्रेसलेट, चांदीचा करदोडा असे साहित्य चोरून नेले.

वाकड येथीलच दुसर्‍या घटनेप्रकरणी फहीम नजमुद्दीन अन्सारी (वय 30, रा. थेरगाव ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची थेरगावातील गंगा आशयाना सोसायटीसमोर पार्क केलेली 30 हजार रूपयांची स्पेंल्डर दुचाकी (एमएच-14, बीएस-0551) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

चिंचवड येथील घटनेप्रकरणी बालाजी अशोक आंबीपुरे (वय-37, रा. रहाटणी, वाकड) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची (एमएच-50, डी. 6985) या क्रमाकांची 25 हजार रूपयांची स्पेंल्डर दुचाकी काळेवाडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.