Pimpri : विविध संघटनांच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथील फुले यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संग्राम तावडे , गिरीजा कुदळे, मयूर जयस्वाल, मकरद्वज यादव, शहाबुद्दीन शेख, संदेश बोर्डे, विशाल कसबे, किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, हिरामण खवळे, संदेश नवले, आबा खराडे, सुनील राऊत, आनंदराव सोंडकर, अनिरुध्द कांबळे, अर्जुन खंडाळे, दिलीप पांढरकर, हर्षवर्धन पांढरकर, सतीश भोसले, विष्णू नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ आदी उपस्थित होते.

सचिन साठे म्हणाले की, पुरोगामी विचारांची पायाभरणी महात्मा जोतिबा फुले यांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचे काम महात्मा जोतिबा फुले यांनी केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूनच महाराष्ट्र प्रगती पथावर आहे. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृती नाकारून स्वतःच्या पत्नीला प्रथम शिक्षित केले. देशाला समतेचा मार्ग दाखविला. समतेचे हे चक्र उलटे फिरवण्याचे काम हे प्रतिगामी सरकार करीत आहे त्यांना सूज्ञ जनता नाकारेल असाही विश्वास साठे यांनी व्यक्त केला.

व्ही . एच. बी. पी. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले .

जोतिराव फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याविषयीची माहिती आपल्या चिमुकल्या शब्दात शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. जोतिराव फुले स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवणारे समाजसुधारक होते. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना स्त्रियांनी शिक्षण घ्यावे यासाठी प्रवृत्त करणारे विचार मांडले. स्त्री शिक्षणाचे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका संगीता पराळे , सविता आंबेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रज्ञा देशमुख यांनी केले.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने पिंपरीतील राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपल्बिलकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, माजी अध्यक्ष भारत हुंडे, शहर सरचिटणीस बाबा सरवदे, ज्येष्ठ नेते रघुनाथ सोनटक्के, दिनकर कांबळे, कुंडलिक कांबळे, भारत भगत, बाबासाहेब कांबळे, लहु कांबळे, मारुती शिवशरण, अमर कांबळे, नारायण वानखेडे, शेषेराव सूर्यवंशी, पंढरी खिल्लारे, अॅड. दीपक ओव्हाळ, सतीश कसबे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.