Pimpri: रस्ते सफाईच्या कंत्राटात अनेक तांत्रिक त्रुटी -आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेत अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्याची पुर्तता करण्यासाठी ठेकेदारांना सात दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

647 कोटी रुपयांच्या कंत्राटात ‘रिंग’ झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले असून 6 पॅकेजसाठी 6 कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटातील आक्षेपांची खातरजमा केली जाईल असे सांगितले होते.

रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या कंत्राटात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्याची पुर्तता करण्यास सांगितले आहे. त्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पुर्ण पडताळणी केल्याशिवाय कोणतेही काम दिले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.