Pimpri : मेट्रो स्टेशन परिसरातून 24 हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या(Pimpri)  खाली ठेवलेले 24 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 18 ते 27 सप्टेंबर या कालावधीत घडली.

कल्याणराव दौलतराव विधाते (वय 59) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Punawale : रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे मेट्रो मध्ये सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) पदावर काम करतात. संत (Pimpri) तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या खाली ठेवलेले 24 हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार 27 सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आला. त्यानंतर चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.