Pimpri : महापौर जाधव यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट!

एमपीसी न्यूज – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर राहुल जाधव यांनी ठाकरे यांची भेट घेऊन आर्शिवाद घेतले. जाधव हे राज ठाकरे यांच्या पाया पडले. ठाकरे यांनी देखील महापौर जाधव यांना पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. तसेच जेव्हा-जेव्हा मदत लागेल. त्यावेळी भेटायला या असेही ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले.  

एका खासगी कार्यक्रमानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे आज (शुक्रवारी) चिंचवड, रहाटणी येथे आले होते. त्यावेळी महापौर राहुल जाधव यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून ठाकरे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी ‘गुफ्तगू’ केले. महापौर राहुल जाधव यापूर्वी मनसेचे नगरसेवक होते. 2004 पासून ते राज ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणात आले होते. मनसेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा केला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदारीवर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये ते भाजपकडून निवडून आले आहेत. नुकतेच ते शहराचे महापौर झाले आहे. परंतु, राज ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा कायम आहे. महापौरपदी विराजमान झालेल्या दिवशी देखील त्यांनी ठाकरे यांनी संधी दिल्यामुळे या पदापर्यंत पोहचल्याचे सांगत त्यांचे आभार मानले होते. जाधव महापौरपदी विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते.

शहराचे प्रथम नागरिक म्हणून आणि पूर्वाश्रमीचे मनसैनिक असलेल्या जाधव यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. त्यांच्या पाया पडून आर्शिवाद घेतले. राज ठाकरे यांनी जाधव यांना पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. जेव्हा-जेव्हा मदत लागेल. त्यावेळी भेटायला या असे ठाकरे यांनी जाधव यांना सांगितले.  राज ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात मोठा आदर असल्याचे जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.