Pune : मराठा आंदोलनातील तोडफोड प्रकरणी 58 जणांना पोलीस तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी

21 जणांना जामीन मिळाला असून न्यायालयनी कोठडीतील 73 जण जमीनासाठी अर्ज करू शकतात

एमपीसी न्यूज – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद दरम्यान गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 194 जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकूण 58 जणांना पोलीस कोठडी तर 113 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून तेथे तोडफोड केली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

आज या सर्वांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजार करण्यात आले. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरणात एकूण 80 जणांना अटक करण्यात आली होती. अटकेतील दोन मुले अल्पवयीन होते तर उरलेल्या पैकी 5 महिला आणि 73 युवकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीतील 73 जण जामिनासाठी अर्ज करू शकतात.

चांदणी चौक दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 55 जणांपैकी 50 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि उर्वरित 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर डेक्कन प्रकरणातील 21 जणांना जामीन मिळला आहे. हिंजवडी तोडफोड प्रकरणी 8 जणांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर वारजे हिंसाचार प्रकरणातील देखील 30 जणांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.