Talegaon Dabhade : शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज मावळ भूषण, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचा 83 वा वाढदिवस व माजी नगरसेविका मंगलाताई काकडे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

आजच्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे विद्यमान आमदार संजय बाळा भेगडे, आमदार दिगंबरशेठ भेगडे, भाजप प्रवक्ता गणेश भेगडे, जि. प.सदस्य बाबुराव वायकर, त.दा. नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संग्रामजी काकडे, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक बाळासाहेब शेळके, नगरसेवक संदीप शेळके, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सदस्य सुरेशभाई शहा, उद्योजक संजय साने, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य मुकुंद खळदे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ.दिलीप भोगे, प्रशांत शहा, अनिल तानकर, गौरी काकडे मान्यवर उपस्थित होते.

यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्व पाहुण्यांची ओळख व स्वागत संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी केले.

जि. प.सदस्य बाबुराव वायकर, डॉ. भोगे यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच मावळचे विद्यमान आमदार संजय बाळा भेगडे, यांनीही शुभेच्छा दिल्या व विद्यार्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की तुम्हाला जर व्यक्तिमत्त्व म्हणून कृष्णराव भेगडे यासारखे व्हायचे असेल तर खूप खूप अभ्यास करावा लागेल, असे प्रेरणादायी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कृष्णराव भेगडे सरांनी आपल्या उत्तरीय भाषणात शाळेचे कौतुक केले. आपल्या नावाने सुरु केलेल्या या शाळेने आपले नाव सार्थक केले असे ते म्हणाले व त्यांनी या संस्थेला वडगाव येथे एक नवीन शाळा सुरु करण्याकरिता एक एकर जमीन देण्याचे हमीपत्र दिले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली जगताप यांनी केले व संस्थेचे अध्यक्ष संदिप काकडे यांनी कार्यक्रमात पाहुण्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.