Pimpri: महापालिका पिंपरीत उभारणार अत्याधुनिक भाजी मंडई

Municipal Corporation to set up Sophisticated vegetable market in Pimpri

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे अत्याधुनिक पाच मजली सुसज्ज भाजी मंडई बांधण्यात येणार असून त्यामध्ये पे अँड पार्किंगची सोय केली जाणार आहे. या भाजी मंडईमुळे शहरातील नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

भाजी मंडई संदर्भात खासदार बारणे यांनी आयुक्त दालनात आज, मंगळवारी बैठक घेतली.

महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सभागृह नेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, शहरअभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता मकरंद निकम बैठकीला उरस्थित होते.

या बैठकीत भाजी मंडईचे सादरीकर करण्यात आले.

त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी भाजी मंडईचा विषय रखडला आहे. येथील व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी पिंपरीत अत्याधुनिक भाजी मंडई उभारली जाणार आहे.

येथे सुमारे पावणे तीन एकर जागा उपलब्ध आहे. त्यामध्ये सर्व सोयीयुक्त मंडई उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून थोड्याच दिवसांत त्याला परवानगी मिळेल.

सध्या त्याठिकाणी 90 भाजी विक्रेते व 75 फळविक्रेते आहेत. त्यांना सर्वांना नवीन भाजी मंडईत गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एक वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे.

कोणाचाही व्यवसाय हिरावला जाणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल असे नियोजन करण्याची सूचना खासदार बारणे यांनी आयुक्तांना दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.