Pimpri: दिवसभरात 59 जणांना कोरोनाची लागण; जळगावातील एकाचा YCMHमध्ये मृत्यू

59 people infected by corona through out the day; One from Jalgaon dies in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 56 जणांना आणि शहराबाहेरील तीन अशा 59 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली.  तर, जळगाव येथील 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरातील कस्पटेवस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, पवारवस्ती, गुलाबनगर, सिद्धार्थनगर दापोडी, पाटीलनगर चिखली, बौद्धनगर, नाणेकरचाळ पिंपरी, जुनी सांगवी, बेलठीकानगर, आदित्य बिर्ला कॉलनी थेरगाव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायकनगर पिंपळेनिलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगाव, बोपोडी येथील 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 33 पुरुष आणि 23 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय जळगाव, हडपसर येथील तीन पुरुषांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

तर, लिंकरोड पिंपरी, जुनी सांगवी, जयभवानीनगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगर, महात्मा फुलेनगर, भाटनगर, समतानगर नवी सांगवी, परंदवाडी, शिरुर आणि आंबेगाव येथील उपचाराला दहा दिवस पुर्ण झालेल्या तसेच कोणतीही लक्षणे नसलेल्या नऊ जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज मंगळवारपर्यंत 843 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 481 बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 14 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 33 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 328 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 232

# पॉझिटीव्ह रुग्ण – 59

#निगेटीव्ह रुग्ण – 59

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 362

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 731

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 62

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 843

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 328

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 33

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 481

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 27394

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 82715

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.