Pimpri: आंतरराज्य हॉकी स्पर्धेसाठी महापालिकेच्या 9 खेळाडूंची निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या वतीने आयोजित आंतररराज्य हॉकी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघात नेहरूनगर, पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी-चिंचवड हॉकी अ‍ॅकॅडमीच्या तब्बल 9 खेळाडूंची निवड झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड हॉकी अ‍ॅकॅडमीची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत शहरातील आणि महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे हॉकीचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण घेणार्‍या 9 खेळाडूंची पुणे जिल्हा संघात निवड झाली आहे.

वरिष्ठ गट संघात सॅबस्टिन दास, अमन शर्मा, रितेश पवार, परमेश्‍वर जाधव, अजय गोटे, निखिल भोसले व अब्दुल सालमनी यांची निवड झाली आहे. तर, कनिष्ठ गट संघात अभिषेक माने व सौरव पाटील यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहे.

या खेळाडूंना ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले तसेच, आंतरराष्ट्रीय खेळाडू विकास पिल्ले व श्रीधरण तंबा यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.