Pune : वारजे परिसरातील बॅगेत आढळला पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पुण्यातील वारजे माळवाडी भागातील पुलाखाली एका बॅगेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील स्मशानभूमीजवळील पुलाखाली काही व्यक्ती गेल्या असता त्यांना येथील उग्र वास येऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर ही माहिती मिळताच वारजे पोलिस येथे दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात एक पुरुषाचा मृतदेह आढळला.

हि माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी हे पाहण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. अग्निशामक आणि पोलिसांनी बागेतून बाहेर काढून शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम म्हणाले, मृतदेह ३२ ते ३५ वयोगटातील आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत घालून पुलावरून टाकला असण्याची शक्यता आहे. वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.