Pimpri: महापालिकेचे तेराशे कोटींचे रेकॉर्ड गायब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील 1339 कोटी 99 लाख 94 हजार रुपयांच्या रकमेची कागदपत्रे गायब झाली आहेत. 195 कोटी 27 लाखांची अर्धवट कागदपत्रे उपलब्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे रेकॉर्ड गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पिंपरी महापालिकेच्या विभागांकडून विकास कामांवर होणारा खर्च व जमांच्या रकमांचे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर तपासणी केली जाते. त्याचा अहवाल लेखापरीक्षण विभागाकडून स्थायी समितीस सादर केला जातो.

मात्र, विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालय, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय यांच्याकडून 2000 पासून नोव्हेंबर 2018 पर्यंत सुमारे 1340 कोटींच्या खर्चाची कागदपत्रे गायब झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.