Pimpri: महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण सेवानिवृत्त

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 17 अधिकारी आणि कर्मचा-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण आज (मंगळवारी) सेवानिवृत्त झाले. चव्हाण सेवानिवृत्त झाल्यामुळे नवीन शहर अभियंता कोण होणार? याची महापालिका कर्मचा-यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, ज्येष्ठतेनुसार सह शहर अभियंता राजन पाटील यांची शहर अभियंतापदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून माहे एप्रिल 2019 अखेर वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 17 अधिकारी आणि कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला. कै. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टुवार, संजय कुलकर्णी, प्रदिप पुजारी, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.

  • महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता दिपक सुपेकर, मुख्य लिपीक संभाजी स्वामी, सतीश औटी, उपलेखापाल शंकर चव्हाण, उद्यान सहाय्यक दिलीप सटाले, सहाय्यक शिक्षक सुधीर कुलकर्णी, हेमा वैशंपायन, उपशिक्षक रत्नमाला जगताप, मृणालिनी कुलकर्णी, वाहन चालक श्रीरंग काळोखे, विठ्ठ्ल देवकर, मुकादम किरणपाल सौदा, फायरमन गोरखनाथ घाडगे, रखवालदार ज्ञानेश्वर शिंदे, शिपाई रमेश आवाळे, आरोग्य कर्मचारी सिंधूबाई शिंदे यांचा समावेश आहे.

सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी निवृत्तीनंतर आपले राहून गेलेले आवडीचे समाजसेवेचे व्रत जोपासावेत, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.