Pimpri : श्री स्वामी समर्थ मंदिरात रंगली सुरेल पहाट

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सुरश्री संगीत साधक संस्था प्रस्तुत सुरेल पहाट या कार्यक्रमात सुगम संगीत, भक्ती संगीत, व भावगीताचा सुरेल नजराणा रसिकांना अनुभवायला मिळाला.

यावेळी संगीत अलंकार निवृत्ती धाबेकर गुरुजी, दिगंबर राणे, अरुणा देवगावकर, अजित घोरपडे, रुपेश सुतार, मधुर ठाकूर, सतीश यादव, शुभम घेवारे, श्रावणी मुळीक, रेणू इटकर, सुषमा साळुंखे, वासंतीका कांबळे या कलाकारांनी सुरेल गाणी सादर केली.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा, हरिनारायण शेळके, मंगेश पाटील, भारत शेंगडे, अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, अक्षदा देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन राजाराम सावंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.