Pimpri: राष्ट्रवादीतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात आज (बुधवारी)झालेल्या या कार्यक्रमाला महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, प्रवक्ते व सरचिटणीस फजल शेख, सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, सचिन माने, संजय औसरमल, मनिषा गटकळ, इम्रान शेख, बाळासाहेब पिल्लेवार, मनिष शेडगे, गणेश पुंडे, संदीप पाटील, मनोहर भोसले, प्रशांत कडलग, शशिकांत निकाळजे, सविता धुमाळ, उल्हास चंदनशिवे, सुनिल अडागळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.