Sangvi : तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला अटक

पूर्ववैमनस्यातून केला खून

एमपीसी न्यूज – सांगवी मधील कामगार वसाहतीजवळ एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 31) पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणावरून खून केल्याचे आरोपीने मान्य केले आहे.
अनिल महावीर खडिया (वय 26, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अजित नंदकुमार भोईया (वय 28, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कामगार वसाहतीजवळ खून झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. प्रथमदर्शी खून झालेल्या व्यक्तीची तसेच खुनाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अत्यंत शिताफीने तपास करून एका आरोपीला अटक केली. अनिल आणि अजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून त्याने अजित याच्या डोक्यात दगड मारून तसेच वार करून खून केला, असल्याचे अनिल याने मान्य केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.