Pimpri : विधानसभेसाठी तयारी; राष्ट्रवादीने मागवले इच्छुकांचे अर्ज

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. या अर्जांची छाननी 3 जुलै रोजी होऊन जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाण्याची सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघाचा नुकताच मुंबईत आढावा घेतला होता. त्यापूर्वी शहरात येऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पक्षाने उमेदवार ठरविण्याची हालचाली सुरु केल्या आहेत.

राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी, ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 1 जुलै पर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात किंवा जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे.

…हे आहेत इच्छुक

चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, पिंपरीतून अण्णा बनसोडे, सुलक्षणा धर, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे आणि भोसरीतून विलास लांडे, दत्ता साने, पंडित गवळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.