Pimpri News: पिंपरी पोलीस चौकीतील कोरोना चाचणी शिबिरात 272 जणांची चाचणी; 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

0

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी पिंपरी पोलिसांच्या वतीने कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आले. मंगळवारी (दि. 27) झालेल्या या शिबिरात 272 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात 6 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या संकल्पनेतून रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिर घेण्यात आले. 22 एप्रिल रोजी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी चौकीत अशा प्रकारचे शिबीर घेण्यात आले.

दापोडी मार्केट मधील विक्रेत्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची या शिबिरात टेस्ट करण्यात आली. यात काही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन तर लक्षणे असणाऱ्यांना योग्य उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्याच धर्तीवर पिंपरी चौकीमध्ये मंगळवारी अशा प्रकारचे ‘कोरोना अँटिजेन टेस्ट’ शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात 272 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यातील 266 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हा पॉझिटिव्हीटी रेट दिवसेंदिवस कमी होत असून ही दिलासादायक बाब आहे.

मात्र खबरदारीमध्ये बेजबाबदारपणा झाल्यास हे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून कारवाई सोबतच अशा प्रकारचे चाचणी शिबिर घेतले जात असल्याने नागरिकांमधून पोलिसांचेही कौतुक होत आहे. पिंपरी पोलीस चौकीत आयोजित शिबिराला भाजी विक्रेते, हमाल, कामगार आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सकाळच्या वेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या शिबिराला भेट दिली. पिंपरी मंडई मधील भाजी विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांना कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आयुक्तांनी आवाहन देखील केले. त्यांनतर सर्वसामान्य नागरिकांसोबत आयुक्तांनी स्वतःची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली त्यात आयुक्तांचा अहवाल निगेटिव्ह आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment