Bhosari Crime News : लग्नात सोन्याची चेन दिली नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात चेन दिली नाही, असे वारंवार बोलून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत विवाहितेने पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 जून 2014 ते 10 मार्च 2021 या कालावधीत जयसिंगपूर कोल्हापूर, कोची केरळ, वेल्हाचेरी चेन्नई आणि स्टार्नबेर्ग जर्मनी येथे घडला.

पती महेश वेंकटरमन, वेंकटरमन गोबीचेट्टी, क्रीष्णवेणी वेंकटरमन (सर्व रा. स्टार्नबेर्ग जर्मनी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी लग्नात चेन दिली नाही, असे सासरचे लोक विवाहितेला वारंवार बोलत. तिला किरकोळ कारणावरून विवाहितेसोबत वाद घालून तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.