Pimpri News : मैत्रिणीला बोलला या कारणावरून तरुणाला सहा जणांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला का बोलला याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यानी व दगडाने दोन तरुणांला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर रोजी सकाळी काळेवाडी येथील एम.एम.स्कूल, डी मार्ट जवळ (Pimpri News) घडला.

यातील सहा ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. संकेत अशोक लोखंडे (वय 20 रा.रहाटणी), सचिन तुकाराम शिंगे (वय23 रा. रहाटणी), अक्षय राजू खताळ (वय 21 रा. रहाटणी), ओकार आबासाहेब पांडुळे (वय 21 रा.रहाटणी), भरत मुकंदा चौधरी (वय 19 रा.रहाटणी),करण परमेश्वर गवाडे (वय 19 रा. थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे असून मयूर किरण पाटील (वय 2 रा. रहाटणी) यांनी वाकड (Pimpri News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Crime : पार्किंग व्यावसायिकाकडे खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व जखमी तरुण शुभम भिला चव्हाण (वय 17) हे आरोपी हे एकाच वर्गात शिकत आहेत. यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम हे संकेत च्या मैत्रिणीला बोलले, याचाच राग मनात धरून आरोपीने त्याचे साथीदार बोलावून फिर्यादी व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्या व दगडाने मारहाण करत जखमी केले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (Pimpri News) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.