Molestation Cases : घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज –  परवानगी शिवाय घरात घुसून तरुणींचा विनयभंग (Molestation Cases) केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत 24 वर्षीय पिडीतेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पी.जी. मालक श्रीनीवास रेडी व त्याचा भाऊ व्यंकटेश रेडी (दोघे रा. बालाजी पी.जी. हिंजवडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri Crime : पार्किंग व्यावसायिकाकडे खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 31 डिसेंबर रोजी तिच्या रुममध्ये बसली असताना आरोपी रुममध्ये आले व त्यांनी पीडितेशी गैरवर्तन केले. त्य़ामुळे पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. याचा जाब विचारण्यासाठी पीडितेचा मित्र गेला असता त्यालाही शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत 26 वर्षीय पीडितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून जलालुद्दीन रोजन खान (वय 45 रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आली आहे. (Molestation Cases) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी झोपल्या असताना आरोपी घरात आला व त्याने फिर्यादीला मारहाण करत गैरवर्तन केले. यामुळे फिर्यादी यांनी त्याच्या तावडीतून सुटत आरडो-ओरड केली. यावेळी फिर्यादी यांचा भाऊ व नणंद तेथे आले. आरोपीने फिर्यादीला धक्का देऊन तुला बघून घेतो म्हणत तेथून पळ काढला. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.