Pimpri News: वर्षभरानंतरही चिंता कायम ! शहरात आज 633 नवीन रुग्णांची नोंद

'ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 112 नवीन रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, वर्षभरानंतरही शहरवासीयांची चिंता कायम आहे. शहरातील रुग्णवाढीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढता आहे. आज (बुधवारी) शहराच्या विविध भागात 633 नवीन रुग्णांची नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 112 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 285 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील भोसरीतील 54 आणि 59 वर्षीय दोन पुरुष रुग्णांचा आज मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 1 लाख 10703 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 3517 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1863 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 785 अशा 2648 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1299 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1226 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 48 हजार 293 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 5022 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.