pimpri news: भूषण जगताप यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे पुणे, नांदेड, बुलढाणा जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, त्यात मावळचे सुपुत्र भूषण जगताप यांची जिल्हा निवडणूक समन्वयकपदी (कार्यक्षेत्र; सासवड, जेजुरी नगरपरिषद) वर्णी लागली.

Pimpri news: महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे – कामगार नेते यशवंत भोसले

भूषण हे सासवडच्या जगताप घराण्याचे थेट वंशज आहेत, ठाकरे सरकारच्या काळात त्यांची महाराष्ट्र शासन मराठी चित्रपट अनुदान समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हाध्यक्ष व शिवसेना मावळ तालुका संघटक पदाचा त्यांना अनुभव आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते आजीव सदस्यही आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.