Pimpri News : कामाचे कौतुक केल्याने काम करण्याचा उत्साह वाढतो – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तीचा सन्मान करून त्याचे कौतुक केल्यास त्याला अधिक उत्साहाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते. या माध्यमातून इतरांना देखील प्रोत्साहन मिळून यश संपादन करण्याची दिशा मिळत असते, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड परिसरातील क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम महापौर दालनात सांगवी येथील शिवामृत ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला. त्यावेळी सत्कारार्थींना शुभेच्छा देताना महापौर ढोरे बोलत होत्या.

सत्कारार्थीना शिवामृत ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, शिवामृत ग्रुपचे प्रमुख सुनिल साठे आदी उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले आणि मोहन जाधव यांचा देखील विशेष सन्मान महापौरांच्या हस्ते करण्यात आला.

महापौर ढोरे म्हणाल्या, “कोरोना काळात पोलीस दलाने जीवाची पर्वा न करता काम केले. तसेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडून नागरीकांच्या हितासाठी काम केले. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. चांगले काम करणा-याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे. त्यातून अधिक उत्साहाने आणि जोमाने काम करण्याची उर्जा प्राप्त होत असते.

शहरातील खेळाडू देखील प्रचंड मेहनतीने यश संपादन करीत असतात. शहराच्या नावलौकिकात खेळाडूंनी नेहमीच भर घातली आहे. या खेळाडूंनी अनेकोत्तम खेळाडू घडवावेत असे आवाहन यावेळी महापौर ढोरे यांनी केले. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी देखील सत्कारार्थीना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कारार्थीची नावे

कबड्डी प्रशिक्षक सुधा खोले
शैक्षणिक क्षेत्र मृदुला महाजन, सुनिता फडके, विजया फर्नाडिम, आरती कांबळे
अ‍ॅथलेटिक्स खेळाडू मनिषा जाधव
क्रिकेट क्षेत्र ऐश्वर्या साठे
क्रिकेट खेळाडू खुशी मुल्ला
धनुर्विद्या खेळाडू सोनल बुंदेले
कराटे प्रशिक्षक स्वाती रानवडे, राखी जगताप
हॉकी खेळाडू यशश्री राजभारत
क्रिकेट प्रशिक्षक पार्वती बकाळे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.