Pimpri News: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी भारती विनोदे

एमपीसी न्यूज – भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी भारती विनोदे यांची नियुक्ती झाली आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या सूचनेनुसार आगामी काळासाठीची भाजप महिला आघाडीची अध्यक्षा उमा खापरे यांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे.

त्यात कार्यकारिणी सदस्यपदी पिंपरी-चिंचवड शहरातील भारती विनोदे यांची वर्णी लागली आहे. विनोदे या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण समितीच्या सदस्या आहेत. तसेच भाजपच्या चिंचवड-किवळे मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. या कामाची दखल घेत त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर काम करण्याची संधी पक्षश्रेष्टींनी दिली आहे.  याशिवाय कोमल काळभोर यांची देखील कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.