Talegaon Dabhade News: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्योती जाधव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्या ज्योती सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे तालुक्यात भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.

याआधी जाधव यांनी मावळ तालुका महिला अध्यक्ष पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळलेला आहे. त्याच बरोबर प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदाला दोन टर्म (6 वर्ष) यशस्वीपणे न्याय देऊन कारकीर्द भूषविली आहे.

जिल्ह्यातील दिवंगत ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांच्या त्या कन्या होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.