Talegaon Dabhade : दिगंबर भेगडे यांची अपूर्ण कामे आम्ही पूर्ण करणार

एमपीसी न्यूज – मावळचे दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे (Talegaon Dabhade) हे निस्वार्थी काम करणारे होते. त्यांनी दहा वर्षाच्या कालावधीत मावळचा कायापालट केला. त्यांनी ठरविलेली आणि अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे, अशा भावना पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या कुटुंबांच्या सांत्वन प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी पुणे जिल्हा किसान संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव शेलार, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,
पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, दिगंबर दादांचे बंधू अण्णासाहेब भेगडे, जनार्दन भेगडे, चिरंजीव मनोहर भेगडे, प्रशांत भेगडे, पुतणे मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे, माजी तालुका अध्यक्ष भाजपा प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, श्री संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पवार, देहूरोड भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, पुणे जिल्हा भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष विलास शिंदे, पुणे जिल्हा भाजपा दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष धीरज नायडू व आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

PCMC: पदोन्नती मिळालेल्या उपअभियंत्यांच्या समुपदेशनाद्वारे करणार बदल्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील स्व. माजी नगराध्यक्ष ॲड. विश्वनाथराव दाभाडे व स्व. माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हा संघचालक सुरेशभाई शहा यांच्या घरी सांत्वनपर भेटी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.