Maval : मावळ भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान

एमपीसी न्यूज – मागील दहा वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या ( Maval ) लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मोदी सरकारने केलेल्या कामांचे पत्रक वाटप केले जाणार आहे. मावळ भाजपने हे लाभार्थी संपर्क अभियान सुरु केले असून निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी मावळ तालुक्यात हे अभियान सुरु केले आहे.

यावेळी मावळ भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष रामदास गाडे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण राक्षे,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी, मावळ भाजपा संघटन मंत्री संतोष राक्षे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सूर्यकांत  सोरटे, युवा मोर्चा कार्याध्यक्ष यादव  सोरटे,मावळ विधानसभा विस्तारक रविंद्र देशपांडे,सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप,गोडुंब्रे गावचे सरपंच गणेश सावंत,चेअरमन दत्तात्रय केदारी,रामभाऊ गोपाळे,खंडू गोपाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

मोदी साहेबांच्या नेतृत्वात मागील 19 वर्षात मोदी सरकारने समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून  ‘ अंत्योदयाचा मूलमंत्र ‘ अमलात आणून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याप्रमाणे देशातील सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सातत्याने विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या ( Maval)  आहेत.

Alandi : मरकळ येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा, पोलीस येताच आरोपी पसार

यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना,जल जिवन मिशन, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री अवास योजना, स्वच्छ भारत मिशन अशा योजना राबवून त्या योजनांचे थेट लाभ सामान्य नागरिकांच्या बँक खात्यामध्ये वितरीत करण्याचे कार्य मोदी सरकारे केले असून 2014 ते आजतागायत देशातील 25 कोटी नागरिकांना याचा लाभ झाला असून आपल्या मावळ तालुक्यात देखील जवळपास 23 हजाराच्यावर कुटुंबांना मोदी सरकारच्या या योजनांचा लाभ मिळालेला आहे.

त्यानुषंगाने काल शिरगाव,गोडुंब्रे, साळुंब्रे,दारुंब्रे,सांगवडे,कुसगाव पमा, पाचाणे,पुसाणे,दिवड,ओवळे,आढले बुll आदी गावातील लाभार्थी कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांना मोदी साहेबांचे पत्रक वाटप केले व त्यांच्याशी संवाद साधून येणाऱ्या काळात देखील मोदी साहेबांच्या नेतृत्वात विकसित भारत राष्ट्र घडविण्यासाठी नवीन भारताचे स्वप्न अधिक गतिने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मोदी साहेबांना मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन मावळ भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे (Maval) यांनी केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.