Maval BJP : स्थापना दिवस निमित्त मावळ भाजपकडून ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टीचा 45 वा स्थापना दिवस मावळ विधानसभा मतदार संघात ( Maval BJP) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मावळ विधानसभा मतदार संघातील सर्वच मंडलात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला अशी माहिती मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.
कामशेत शहर भाजपच्या वतीने जनसंघापासून काम करणारे ज्येष्ठ नेते पांडुरंग उंडे व बाळासाहेब गोरे यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी तळेगाव शहर भाजपा कार्यालयात किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे, कार्याध्यक्ष वैभव कोतूळकर,युवा मोर्चा अध्यक्ष गौरव गुंड, तळेगाव शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा शोभा परदेशी,वडगाव पक्ष कार्यालयात मा.सभापती गुलाब म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम  कदम,कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, सरचिटणीस अभिमन्यू शिंदे तर लोणावळा शहर भाजपा कार्यालयात मा.नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मा.उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि देहूरोड शहर कार्यालयात ( Maval BJP) जेष्ठ नेते भास्कर आप्पा म्हाळस्कर , गुरुमितसिंग रत्तू,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मा.अध्यक्ष कैलास पानसरे तर कामशेत येथे जेष्ठ नेते माऊली शिंदे,राजाराम शिंदे,शंकर शिंदे,सुकण बाफना,संतोष कुंभार,कामशेत शहर भाजपा अध्यक्ष विजय शिंदे, कामशेत शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे उपस्थित होते आणि इंदोरी शहर येथे मा.सभापती ज्योती शिंदे, ग्रा.सदस्य संदीप ढोरे,संदीप नाटक,निलम पानसरे, बूथ अध्यक्ष अजित राऊत,संस्कार चव्हाण, ऋतुराज काशीदआदी प्रमुख उपस्थित होते.
 मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय तथा भाऊ गुंड यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयावर भारतीय जनता पक्षाचा झेंड्याचे ध्वारोहण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व स्व. श्रद्धेय पंडित दीनदयाळजी उपाध्याय व भारतमातेचे पूजन करून त्यांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले व स्थापना दिन साजरा करण्यात आला.

तसेच तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष अशोक दाभाडे,लोणावळा शहर भाजपचे अध्यक्ष अरुण लाड व देहूरोड शहर भाजपचे अध्यक्ष रविंद्र उर्फ लहु शेलार यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या मंडलात ध्वजारोहण करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून हा दिवस( Maval BJP) उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याचसोबत इंदोरी शहर भाजपच्यावतीने देखील प्रशांत ढोरे,मनोहर भेगडे व इंदोरी शहर भाजपा अध्यक्ष  महेश पानसरे यांच्या हस्ते ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती शिंदे,ज्ञानेश्वर कुलकर्णी,संतूर गायकवाड, धोंडिबा पानसरे,अशोक शेवकर,जगन्नाथ शेवकर,ज्ञानेश्वर कुलकर्णी,पोपट साळुंके,नथू भांबुरे,बाजीराव ढोरे, आनंद शिंदे,अशोक शेवकर,खंडू पानसरे,दशरथ ढोरे,साहीनाथ बागेकर,विष्णू दगडे आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या जुन्या काळातील कडू गोड आठवणी सांगून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्वच मंडलातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या मंडलातील कार्यक्रमास मोठ्या संख्येने  ( Maval BJP)  उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.