Pimpri News: शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी ‘कोविशिल्ड’ची लस  मिळणार  

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) ‘कोविशिल्ड’चा  पहिला, दुसरा तर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस

हेडगेवार जलतरण तलाव, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा वाकड,  अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,  मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,  कन्या शाळा चिखली, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर,  तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती,  यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग आणि अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी या 21 केंद्रांवर  कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या आणि  किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या  लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

या ‘नऊ’ ठिकाणी ऑनदस्पॉट ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार
कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव आणि आचार्य अत्रे सभागृह या नऊ ठिकाणी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना  ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पध्दतीने 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर लस मिळणार
संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना,  आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना,  बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी,महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, पिंपळेनिलख इंगोले शाळा,  महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, सखुबाई गार्डन भोसरी,  गंगोत्री पार्क दिघी, घरकुल दवाखाना चिखली,

महापालिका शाळा जाधववाडी, ठाकरे शाळा रूपीनगर, भानसे स्कुल यमुनानगर, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव,   महापालिका शाळा रहाटणी, दिनदयाल शाळा पवना बँक मागे संत तुकारामनगर पिंपरी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा सांगवी आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 28 केंद्रांवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन या पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

तर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर आणि मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल येथे  18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 50 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,  आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.