Pimpri : पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना, वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांना कायद्यानुसार दीपावली पूर्वी बोनस देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिपंरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri ) यशवंत मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेली 5 ते 15 वर्षापासून नर्सेस मानधनावर सलग सेवेत कार्यरत असून त्यांच्यासह पालिकेतील सुमारे 5000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस कायद्यानुसार बोनस लागू होत आहे. त्यांना दीपावली पूर्वी बोनस द्यावा अशी लेखी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यावेळी बोनस कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत विचार केला जाईल असे सकारात्मक उत्तर आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आल्याचे भोसले म्हणाले. ही मागणी मान्य झाल्यास पालिकेत कर्तव्य बजावत असलेल्या मानधनावरील व कंत्राटी सुमारे 5000 कर्मच्या-यांची दीपावली आनंदात जाणार साजरी होणार असून आयुक्त शेखर सिंह हे कर्मचारी व शहरातील (Pimpri ) नागरिकांचे प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचे सांगत त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

Dehugaon : दहावीत शिकणाऱ्या मुलीची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

सर्व नर्सेस या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सभासद असून त्यांना बोनस कायद्यानुसार दीपावली पूर्वी महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम स्वानुग्रह अनुदान समान काम समान वेतन या कायद्यानुसार देण्यात यावे. अशी मागणी यावेळी भोसली यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.