Pimpri News: संविधान भवनाचा प्रकल्प रेंगाळू न देता कामाला गती देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 5 व 8 मधील मोकळ्या भूखंडावर “संविधान भवन” उभारणी करण्यासाठी 10 एकर जागा नियोजीत करून अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु, प्राधिकरणाच्या विलीनीकरणामुळे हा प्रकल्प न रेंगाळत, कामाला गती देण्याची मागणी नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त प्रतापराव जाधव यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते रमेश खरात, अंकुश मळेकर, संदिप शेलार,हेमंत भोसले,किरण डोळस उपस्थित होते. त्यात नगरसेवक गायकवाड, डोळस यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये साकारत असलेल्या “संविधान भवनाच्या” कामाला गती मिळावी. शहरात संविधान भवन आकाराला यावे यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 5 व 8 मधील मोकळ्या भूखंडावर “संविधान भवन”उभारणी करण्यासाठी 10 एकर जागा नियोजीत करून अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रूपयांची तरतूद केली होती. नुकतेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे “पीएमआरडीए” मध्ये विलीनीकरण झाले आहे. या निर्णयामुळे संविधान भवनाचा प्रकल्प रेंगाळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प रेंगाळू न देता कामाला गती देण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.